
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील जिल्हा परिषद शाळा बाल क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम सविस्तर वृत्त असे राळेगाव पंचायत समितीच्या वतीने दिनांक ५,६, ७, जानेवारी पर्यंत तालुक्यातील झाडगाव येथे तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा सामने घेण्यात आले होते या सामन्यात रिधोरा जिल्हा परिषद शाळेचे ६ ते ११ वयोगटातील विद्यार्थी यांनी खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर योगा मध्ये ११ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक पटकावला सदर या विजयाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक राष्ट्रपाल सुखदेव, कुमारी एचएम पांडे, कुमारी अनिता राऊत, सचिन कुंभारे, रंजना खनतडे, नयन गुरनुले, यांना देण्यात आले आहे.
