राज्यस्तरीय हॅन्डबॉल मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल ची गगनभरारी ,विजेता संघ 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या हॅन्डबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


अमरावती विभागीय स्तरीय 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या हॅन्डबॉल मैदानी स्पर्धा तालुका क्रीडा संकुल क्रीडागण कारंजा लाड जि. वाशीम येथे दिनांक 16 जानेवारी रोजी पार पडली यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मैदानी स्पर्धेत आपला दबदबा असणारे राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील 17 वर्ष वयोगटातील मुलींचा विद्यार्थीनीचा संघ झालेल्या अंतिम स्पर्धेत विजेता ठरला यामध्ये शाळेतील अमरावती विभागस्तरिय विजयी संघात खेळाडूं म्हणून कु. जानवी मेश्राम, तनु काकडे, तनिषा बेहरे, नंदिनी भगत, राधिका राऊत, श्रावणी सातपुते, संस्कृती झलके, स्नेहा अक्कलवार, आचल झाडें, उन्नती झाडें, तन्वी गजबे, छकुली पुरके, तम्मना गजबे, रिद्धी इखार हे विद्यार्थी खेडाळू म्हणून उपस्थित होते. तर विभाग स्तरावर विजयी संघ आता हॅन्डबॉल राज्य स्पर्धा साठी विभागीय क्रीडा संकुल, नागपूर येथे दिनांक 22 जानेवारी ते 25 जानेवारी रोजी उपस्थित राहणार आहे तसेच विजयी संघास
शाळेतील क्रीडा शिक्षक विजय कचरे,किशोर उइके,सूचित बेहरे, प्रविण कारेकार यांनी तसेच हॅन्डबॉल क्रीडा
मार्गदर्शक म्हणून रवी भुसणवार, स्वप्नील आडे, सौरभ चौधरी, सागर जुमनाके, तालूका क्रीडा अधिकारी सचिन्द्र मिलमिले, तालूका क्रीडा संयोजक प्रफुल खडसे नरेश दुर्गे यांनी मार्गदर्शन
यांनी केले असून
विजेता संघ नागपूर येथील राज्यस्तरीय हॅन्डबॉल मैदानी स्पर्धेस पात्र ठरल्या मुळे विजेत्यां संघातील खेडाळूवर सर्वत्र जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.विजेत्यां संघास मा. सौं. नंदा खुरपूडे जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ , न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव चे अध्यक्ष बी. के. धर्मे,सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, व शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे…..