बंजारा कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर राठोड आणि राष्ट्रीय महासचिव अशोक राठोड यांचा राळेगाव येथे सत्कार

सहसंपादक: रामभाऊ भोयर

भारतीय बंजारा समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश द्वारा आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन व रजत महोत्सव सोहळा यांचे दिनांक 2आणि 3 फेब्रुवारीला गुरू ग्रंथ साहिब भवन हिंगोली गेट जवळ नांदेड येथे आयोजित करण्यात आला असल्याने त्या निमित्ताने महाराष्ट्र दौरा करून राळेगाव येथे भारतीय बंजारा कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बिड जिल्हा रहिवासी श्री दिगंबर राठोड तसेच भारतीय बंजारा कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय सचिव तथा चंद्रपूर निवासी श्री अशोक राठोड यांचा भारतीय बंजारा कर्मचारी संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे संचालक श्री श्रावनसिंग वडते सर आणि सामाजिक कार्यकर्ते ताराचंद पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.त्यावेळी संस्थापक अध्यक्ष दिगंबर राठोड, राष्ट्रीय सचिव अशोक राठोड, राळेगाव तालुका अध्यक्ष श्रावनसिंग वडते, ताराचंद पवार , शिंदे, संजय जुमळे, सचिन बोरकर, बळवंत पाझारे, अवधूत शेराम तसेच बंजारा समाजातील कर्मचारी उपस्थित होते.