राळेगाव येथील सौ .संतोषीताई राजजी वर्मा कर्तृत्व पुरस्काराने सम्मानित


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

नांदेड येथे, जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड व छावा श्रमिक संघटना द्वारा आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव २०२३ या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या कामगिरी बद्दल सम्मान करण्यात आला या वेळी नांदेड – दक्षिणचे लोकप्रिय आमदार श्री. मोहन अण्णाजी हंबर्डे तसेच नांदेड़ च्या सौ. पावडेताई यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते, भारतीय नारी रक्षा संघटना,जिल्हा उपाध्यक्षा,व तालुकाध्यक्षा ,श्री.मैढ़ सोनार रिश्ते मंच एडमिन,पत्रकार सौ.संतोषीताई राजजी वर्मा, यांचा सामाजिक व राजकीय कर्तुत्वाची दक्षता घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव, पालकवर्ग, जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक श्री.भास्करराव हंबर्डे व इतर मान्यवर उपस्थित होते.