
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील संगम (में ) येथील संकेत ज्ञानेश्वर थुटुरकार (24) या युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. नापिकी कर्जबाजारीपणा या मुळे तॊ चिंतेत असल्याची माहिती आहे.त्याचे वडिलांचे नावे चार एकर शेती आहे. तॊ घरचा कर्ता मुलगा होता. मध्यवर्ती को. ऑप. बँक चे 40 हजार व मायक्रो फायनान्स चे कर्ज त्यांचेवर होते.
काल (दी.13 ) तॊ बैल घेऊन शेतात गेला तॊ परत आला नाही. रात्री गावातील युवकांनी परिसरात शोध घेतला तेव्हा जिवतोडे यांच्या शेतातील विहिरीजवळ त्याच्या चपला आढळून आल्या ही बाब राळेगाव पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यात त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. राळेगाव ग्रामीण रुग्णालयाट शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याचेवर मुळगाव संगम येथे अंत्यसंस्कार आले. आई – वडील एक लहानभाऊ असा परिवार त्याच्या मागे आहे. युवा शेतकऱ्याच्या या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
