
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्या, समस्या घेऊन दिनांक 24/9/2024 रोज मंगळवारला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाचे आयोजन केले त्यावेळी वातावरण चांगले होते पण ऐन मोर्चाच्या दिवशी सकाळपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आणि पाऊस सुद्धा सुरू होता.पावसामुळे मोर्चा वेळेपेक्षा बराच उशीरा निघाला.हा मोर्चा कांग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयापासून ऐन पावसाळ्यात सरकारच्या विरोधात नारे देत सोबतच मागण्यांचे नारे देत शहरातून फिरत फिरत राळेगाव तहसिल कार्यालयाजवळ धडकला.कार्यालयासमोर या मोर्चाला माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर, अँडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमच्या शेवटी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.आश्वासन दिले आणि उपस्थित जनतेची मने जिंकली. या कार्यक्रमात , शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, ओबीसी
विभागाचे अरविंद वाढोणकर, राजेंद्र तेलंगे, प्रदीप ठुणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद काकडे, शहर प्रमुख इम्रान खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राळेगाव तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, मिलिंद इंगोले, जानराव गिरी, नंदकुमार गांधी, तसेच विविध सहकार क्षेत्रातील मुरब्बी पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार उपस्थित होते. अशा ऐनवेळी वातावरण बिघडून सुद्धा पाच हजारांच्या जवळपास संख्या उपस्थित होते.यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांला निवेदन दिले आणि ताबडतोब शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सांगितले.या मोर्चातील आजची उपस्थिती सत्ताधाऱ्यांची झोप उडविणारी होती या मोर्चाची पूर्ण तालुक्यातील जनतेत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
