एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राळेगाव अंतर्गत आनंददायी बालशिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे व मा.डॉ प्रशांत गावंडे साहेब प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. यवतमाळ व बालशिक्षण विभागाच्या जिल्हा नोडल अधिकारी मधुमती सांगळे डाएट यवतमाळ यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार को – लोकेटेड अंगणवाडी सेविका यांच्यासाठी दोन दिवसीय आनंददायी बालशिक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राळेगाव अंतर्गत करण्यात आले होते.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर विठाळकर हे होते, तसेच मास्टर ट्रेनर पर्यवेक्षिका श्रीमती संजिवनी ओंकार, मंजुश्री खसाळे, निशा पाटील, होत्या. प्रशिक्षणाला श्रीमती भारती इसळ सह्हायक गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव तसेच डॉ. बहाड RBSK टिम राळेगाव यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊमाता यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, यावेळी तिनही पर्यवेक्षिका यांनी आनंदी बाल शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले. तसेच खेळणी आधारित अध्यापनशास्त्र याविषयक काही कृती करुन दाखविण्यात आल्या,सर्व पर्यवेक्षिका यांनी सुलभकांचे काम करून सर्व अंगणवाडी सेविका यांना विविध खेळ वस्तू गाणी बडबडगीते याबाबतीत कृती द्वारे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रात सर्व अंगणवाडी सेविका यांनी आपापले मनोगत व्यक्त केले,तसेच विविध स्पर्धा, रांगोळी, तसेच विविध प्रकारची बडबडगीते सादर करण्यात आली, पर्यवेक्षिका निशा पाटील व मंजुश्री खसाळे यांनी तर अंगणवाडी केन्द्रात पालकांसोबत कसे नाचावे, शिकवावे ह्या सर्व गोष्टी कृतीतून शिकविल्या व सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते,