
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आष्टोणा ते सावित्री पांदन रस्त्यांची दयनीय अवस्था सविस्तर वृत्त असे नुकतेच दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री निधीतून या परिसरात पांदन रस्त्यांचे काम झाले असून सदर शासनाच्या धोरणानुसार गाव तेथे रस्ता ही मोहीम राबविण्यात येत आहेत परंतु असे न होता या कामात निकृष्टता दिसून येत आहे.सदर शासन लाखो रुपयांचे खर्च करून याचा फायदा शेतकऱ्यांना होतांना दिसत नाही सदर ची अशीच परिस्थिती सध्या तालुक्यात आष्टोणा ते सावित्री
रोडवरील मोहन कुत्तरमारे यांचे शेताजवळील रपट्याबाबत व मंगी ते खैरी रोडवरील हिम्मत ठावरी यांच्या शेताजवळील रपट्याबाबत वरील सर्व गावे राळेगाव तालुक्यातील असुन यवतमाळ जिल्हातील आहे नुकतेच दोन वर्षापूर्वी मा. पालकमंत्री यांचे निधीमधुन पांदनरस्त्याचे काम झालेले असुन शासनाच्या धोरणानुसार गाव तिथे शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरीता रस्ते निर्माण केलेले आहे. परंतु वरील सर्व रस्ते नाल्यावरील रपट्यामुळे जीव घेणे ठरत आहे. बंडी बैल, वाहने कशे न्यावे हा प्रश्न पडलेला आहे. बरेचदा या रस्त्याबाबत लोकप्रतिनिधीना व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सांगितले असता कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे केव्हा कोणती हाणी होईल नाकारता येत नाही. तरी या बाबीकडे लक्षदेऊन कामे करून देण्यात यावे. व जनतेस होणारे नुकसान टाळावे. व तसेच या रोडचे खडीकरण व डांबरी करण शासनाच्या योजनेतून करून देण्यात यावे. अशी आष्टोणा, खैरी, मंगी, सावित्री ग्रामस्थांची मागणी आहे.
