
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी
शहरांमध्ये बऱ्याच वर्षानंतर क्रिकेटचे खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले असल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जातीय सलोखा राखण्याच्या उद्देशाने हे सामने दिनांक 5 फेब्रुवारीपासून सुरू होत असून दत्त मंदिर टेंभेश्वर नगर मैदानात खेळले जाणार आहेत.
51000 चे प्रथम पारितोषिक, 41111 द्वितीय पारितोषिक, 31001 तृतीय पारितोषिक व 21000चतुर्थ पारितोषिक हे या सामन्याचे आकर्षण आहे. या सामन्यात प्रवेश घेण्याची फी 2000 रु समिती ने ठेवली आहे.
शहरातील मॉर्निंग क्रिकेट क्लबने या सामन्यांचे आयोजन केले. विशेष म्हणजे हा क्लब टेंभेश्वर नगर येथील मैदानात नियमित सराव करत असून खेळाचे महत्व हे युवा पिढीमध्ये रुजवण्याचे मोठे कार्य करत आहे.
या क्रिकेटचे खुल्या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त क्रिकेट संघाने आपला सहभाग नोंदवावा व अधिक माहिती साठी 8421752358, 9158262740, 8308959570, 8857849020 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजन समितीने अध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे , बाळू योगावार, सय्यद अलीम, नागेश रातोळे, मुकेश ईरनलवाड, सुदर्शन देवरकर, शेख निसार सतीश चव्हाण,नितीन गायकवाड,संभाजी गोरटकर, यांनी केले आहे.
