
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
सद्यस्थितीत कुठल्याही शेतमालाला भाव नसल्याने बहुतांश माल हे शेतकऱ्यांच्या घरीच आहे पण शेतकऱ्याला खर्च हा करावाच लागतो त्यामुळे खर्चासाठी कुठले पीक विकावे हा प्रश्न सध्या शेतकऱ्यासमोर आहे।।। कापूस हा कधीचाच निघत आहे सोयाबीन सुद्धा कधीच निघाले आहे आता बहुतांश शेतकऱ्यांचे तूरपीक सुद्धा घरी आले आहेत पण या तिन्ही पिकाला पाहिजे तसा भाव सद्यस्थितीत नाही कापसाला तर अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळत आहे सद्यस्थितीत कापूस हा 8000 रुपये प्रति क्विंटल किंवा त्यापेक्षाही कमी भावात विकल्या जात आहे त्यामुळे शेतकरी गरजेचा कापूस विकत आहे अजूनही भाव नसल्याने बहुतांश कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे सोयाबीनचीही हीच अवस्था आहे सोयाबीनचे दर हे 5000 रुपयांच्या दरम्यान आहे उत्पादन आणि खर्च याचा हिशोब काढला तरी पाच हजार रुपये भावात शेतकऱ्यांना सोयाबीन विकाव्यास परवडत नाही त्यामुळे बहुतांश शेतकऱ्याचे सोयाबीन ही घरातच आहे सध्या तुरीचे पीक घरी येणे सुरू आहे पण यावर्षी अतिवृष्टीमुळे व नंतर आलेल्या तुरीवरच्या रोगामुळे तुरीचे पीक जेमतेम आहे पण त्यालाही भाव नाही तुरीला सध्या 6000 ते 7000 रुपये दरम्यान भाव मिळत आहे या भावात तूर विकणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही कुठल्याच शेतमालाला सध्या भाव नाही पण शेतकऱ्याला घर खर्च चालवायचा आहे किंवा इतरही काम आहेत त्यामुळे कुठलातरी शेतमाल त्याला विकावाच लागणार आहे सर्व शतमाल घरी ठेवून शेतकरी खर्च कुठून चालवणार त्यामुळे गरजे इतका शेतमाल सध्या शेतकरी विकत आहे तो विकता नाही कोणता शेतमाल आता विका व कोणता शेतमाल ठेवून द्यावा या द्विधा मनस्थितीत शेतकरी आहे कारण कोणत्या मालाला भविष्यात भाव येईल हे सध्या तरी कोणी सांगू शकत नाही याबाबत शेतकरीही अनभिज्ञच असतो त्यामुळे सध्या तो स्वतःपुरते निर्णय घेऊन काही प्रमाणात थोडा थोडा माल विकत आहे या तिन्ही शेतमाला बद्दल बोलायचे झाल्यास सध्याचे भाव वाढीचे चित्र हे विदारक आहे व भविष्यातही या शेतमालाच्या भाववाढीबद्दल फारसे आशादायक चित्र नाही त्यामुळे शेतकऱ्याला सध्या कोणता शेतमाल विकाव कोणता ठेवावा हे न समजत असल्याने शेतकऱ्यांपुढे कोणता शेतमाल विकावा हा प्रश्न आहेत।।।। राजकारणी ,शासनकर्ता गप्प ।।।कापसाला गेल्यावर्षी 14 हजारापर्यंत भाव होता तुरीही 15 हजारापर्यंत गेल्या होत्या सोयाबीन एक दोन वर्ष अगोदर 15000 पर्यंत गेले होते मग या सर्व शेतमालांचे भाव सद्यस्थितीत का पडले हे मात्र कोणी सांगावयास तयार नाही यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्याच्या आर्थिक गणित हे कोलमडत आहे शेतमालाचे भाव पडण्यामागे शासनाचे आयात निर्यात धोरण हे बरेच कारणीभूत आहे मात्र याबाबत कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता बोलावयास तयार नाही सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही गप्प आहेत पंधरा हजारावर गेलेले शेतमालाचे भाव पाच हजारावर का आले याबाबत नेमके चित्र समोर आले पाहिजे सोबतच भावाला गत वैभव सुद्धा आले पाहिजे याबाबत राजकारण्यांनी निश्चितच पुढाकार घ्यायला पाहिजे त्यामुळेच शेतमालाचे वास्तव चित्र समोरील व शेतमालाचे भाव वाढण्यास मदत होईल नाहीतर शेतकरी या भाववाढीच्या चक्रव्यूहात अडकून त्याचा अभिमन्यू झाल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे.
