
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल मतदारसंघ असुन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1990 पर्यंत हा कांग्रेस चा बालेकिल्ला होता.1990 ला पहिल्यांदा नेताजी राजगडकर यांनी जनता दलाच्या चिन्हावर निवडणूक लढवुन पहिल्यांदा विजयश्री खेचुन आणली, आणि कांग्रेस च्या बालेकिल्यातील परपंरागत मतदार हळूहळू कांग्रेस पासून दुर जाऊ लागला त्याला एकमेव कारण निवडुन आलेल्या उमेदवारांचे मतदार संघाकडे झालेले दुर्लक्ष.तालुक्यात सर्व दुर फिरत असतांना असे जाणवते की विकास कुठेच जाणवत नाही.तरुणाच्या हाताला काम मिळेल असा एकही उद्योग कोणालाच उभारता आला नाही किंवा त्या दिशेने कोणी प्रयत्नही केले नाही म्हणून कांग्रेस च्या परंपरागत मतदाराने कांग्रेस कडे पाठ फिरवली व तो मतदार जातियवादी पक्षाकडे आकर्षित झाला.ही मोठी पोकळी भरून निघेल यासाठी व जनसामान्यांना कांग्रेस कडे आकर्षित करण्यासाठी ज्या जन आंदोलनाची गरज होती असे प्रयत्न कोणाकडून ही झाले नाही..
अशोक मेश्राम वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करत असतांना मा.राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेने भारावून गेलो आणि स्वतः कांग्रेस पक्षासाठी काम करण्याचे ठरविले व राहुल जी गांधी च्या संविधान बचाओ, हुकुमशाही हटावो, धर्मनिरपेक्षतेची पुनर्स्थापना या तत्त्वावर श्रध्दा ठेऊन राजकारणात उडी घेतली व अवघा मतदारसंघ पिंजुन काढला,जनतेच्या समस्या ऐकुन घेऊन त्यांचे प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी तालुक्यात आंदोलनाचा सपाटा लावला, शेतकरी प्रश्न असो की महिला वरील अन्याय अत्याचार त्यासाठी अशोक मेश्राम सतत संघर्ष करत आहे, त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या कडे जनता आपोआपच आकृष्ट होत आहे, प्रत्येक धर्मनिरपेक्ष मतदारांना असे वाटत आहे की बीजेपी ला पराभूत करायचे असेल तर अशोक मेश्राम सारखा तगडा उमेदवार कांग्रेस ने उभा केला तर विजयश्री खेचुन आणण्यात कोणतीच अड़चन नाही असे ऐकायला मिळत आहे.
