
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी नुकतेच बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पदी संतोष मनवर रुजू झाले व त्यांनी बिटरगाव(बु)पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला असून बिटरगाव(बु)पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी शहरात समाजकंटकांनी अनंत चतुर्दशी चे दिवशी धुमाकूळ घालून गणरायाच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली. ७४ जणांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत, परंतु अद्याप काही गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत . त्यादिवशी चे रात्री धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याचे सुद्धा नागरिकांतून बोलले जात होते. त्यामुळे सर्वत्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवून वेळीच मुस्क्या आवळणे गरजेचे आहे.कठोरात कठोर कारवाई करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे गरजेचे आहे.असे तगडे आव्हान बिटरगाव पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित ठाणेदार मनवर यांच्यावर आहे. त्यांनी मुकुटबन येथे ठाणेदार पदी असताना अनेक दबंग अशा कामगिऱ्या केल्याचे ऐकीवात आहे. तसेच अनेक अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले असल्याचे अनेक किस्से नागरिकातून कळते .परंतु बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत खुलेआम फिरणाऱ्या व हातात शस्त्र बाळगणाऱ्या गाव गुंडांच्या कशा तहेने मुसक्या आवळून कठोरात कठोर कार्यवाही करतील या बाबीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
