गुरु पाहता लक्ष कोटी
बहुसाल मंत्रावळी
शक्तीमोठी
मनी कामना चेटके धातमाता!
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तीदाता


आपण आयुष्यात रममान होऊन अगदी मृत्यू कधी येणारच नाही व इश कृपेने मिळालेला देह अजरामर असून सर्व काही सोबत येणार आहे अशा परिस्थितीत सर्व सामान्य व्यक्ती वावरत असतो अशी जाण होताना बघायला मिळते आणि मोह, लोभातून, आणि जीवनाचा मूळ मर्म कळण्यासाठी गुरु अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पण आजकाल लोभी आणि पैशाच्या मागे धावणारे समाजसेवक आणि लोभी साधू स्वतःचा फायदा होईल अशीच मृगजल वाणीचा आणि कर्माचा वापर करतात तसेच नीतिमत्ता बाजूला सारून स्वतःच धर्ममार्तंड म्हणवणारे खरंच समाजसेवक किंवा साधू आहेत?? एवढे काळे कुठे कारभार करत असताना अशा व्यक्तींना आपण करत असलेल्या कर्माचा पश्चाताप वाटत नाही उलट तोच व्यक्ती छाती काढून व हाताला झटके देत समाजात वावरतो आणि यांच्या मुखात परमेश्वराचे नाव तर बगले मध्ये स्वार्थाची आणि पैसा कमावण्याची सुरी असताना असे समाजसेवक साधू मी म्हणजे सर्वकाही अशा अविर्भावात वावरतात तेव्हा असे समाजसेवक गुरु असतीलच असे नाही लोकांना फसवून स्वतः नामा निराळे राहणाऱ्या व्यक्तीचा जादूचा प्रयोग लोकांनी आता ओळखला आहे पण नक्कीच अशी नीतिमत्ता बाजूला सारून लुटीच्या साम्राज्याला बळकटी देणाऱ्या उपटसुंभ सर्वसामान्य पुढे उभे ठाकून काय बोलणार म्हणुच की काय यावेळी गणपती उत्सवामध्ये अनेकांचे मनसुबे हाणून पाडले तेल ही गेलं आणि तूप ही गेलं अन् हाती धूपाटन आलं अशी गत स्वयंघोषित समाजसेवकाची झालेली दिसली.धर्माचा आणि अध्यात्माचा वापर उपयोग करून सर्वसामान्यांना व देशाची आणि राष्ट्राच्या संपत्ती असलेल्या तरुणांना चिथऊन घेऊन आपण मात्र सुरक्षित राहून फसवण्याचे काम करीत असतात वास्तवात समाजसेवक आणि साधू फसविणे तर दूरच पण फसलेल्या व्यक्तीला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात हीच खरी वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच साधूसंताला व समाजाची सेवा करणाऱ्यांना सर्वसामान्यांना ईश्वर तुल्यच असतात
याला अनुसरून मराठी मुलुकी सारस्वताची स्त्रीशक्ती रचनाकार शांताबाई शेळके गुरू विषयी शब्दरचना रेखाटताना अत्यंत सुंदर आणि उद्बोधक अशी रचना रचतात
गुरु प्रेमळ गुरु उदार जडतेचा हरूनी भार
न्यावयास पैलपार एकमेव गुरूउपाय
गुरु सूर्य आकाशी गुरू तारा रम्य
शशी तोच अग्नि जलराशी ओलांडून विश्व जाये

मार्गदर्शक गुरूला आयुष्यात एवढे महत्त्वाचे स्थान स्त्रीशक्ती कविवर्य शांता शेळके यांनी दिली गुरूंचे विधान हे अटळ तर असतेस शिवाय वास्तव असते गुरु प्रेमळ व सकारार्थी विचार प्रवर्तित करून अपप्रवृत्ती चे निधन करतो शिवाय खोटारडी लुबाडून खाणाऱ्या आणि नीतिमत्ता व शिकवणीला बगल देऊन संपत्ती कमावत असल्यास अशांना सदमार्ग दाखवितात पण धर्मदारी कुत्र आड अशी अवस्था सध्या समाजसेवकाची बनली आहे तसेच फलश्रुती होण्यासाठी इतरांना संकटात टाकून आपल्याला फायदा करून घेण्याची वृत्ती साधू आणि स्वयंघोषित समाजसेवकाचा हा जादूचा प्रयोग आता जास्त काळ टिकणार नाही कमिशन खोरी दलालीच्या नीतिमत्तेने कमावलेले धन जास्त काळ टिकत नसते तेव्हा अशा बांगडबुंग्या इतरांना संकटात टाकून स्वतःचे घर भरणाऱ्या वेळप्रसंगी चड्डीत चिरकणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहिले पाहिजे कारण ते गुरु आणि मार्गदर्शक कसे होतील. गुरुप्रेमळ वृत्तीचे शिकवण देतात तर वाईट वृत्तीचे निधन करतात श्री समर्थ म्हणतात सर्वसामान्य माणसाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ढोंगी साधू समाजसेवक लोकांना लुबाडतात अशा लुबाडून लुटून मुरगाळून खाणाऱ्या तथाकथीत साधू आणि स्वयंघोषित समाजसेवकापासून दूर राहिले पाहिजे साधुसंत आणि समाजसेवक तोच असतो जो फक्त शाश्वत सत्याची दाहकता दाखवतो व आत्म्याचा परिचय करून देतो.
अत्रिनंदन श्रीगुरुदेवदत्त दिगांबर


निरूपणकार::प्रवीण जोशी
ढाणकी