स्वस्त ध्यान्य दुकानातून गहू गायब, ( गव्हाच्या पोळीची चव दोन महिन्यासाठी भाकरीच्या चवीत बदलणार )

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शासकीय स्वस्त धान्य दुकानातुन गहू गायब करण्यात आला असून ज्वारी वाटप करण्यात येत आहे. गणपती, महालक्षमी उत्सव आले असून जनतेला गोड शिधा वाटप करण्याऐवजी ज्वारी वाटप करण्यात येत आहे. दोन महिने ज्वारी वाटप केल्या जातील अशी माहिती आली असून सणासुदीला गोड शिधा सोडून ज्वारी खायला दिली असून शिधा कधी येणार याकडे सुद्धा सामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. स्वस्त धान्य दुकानातून फक्त ज्वारी व तांदूळ मिळत असून लहान मुलांच्या टिफिन मध्ये भाकरी कशी द्यायची लहान मुलांना ती पचन करायला जड जाणार त्यामुळे फक्त खिचडीच देऊ अशाप्रकारची चर्चा महिलाकडून होत असताना गहू महाग झाल्यामुळे शासनाने ज्वारी खरेदी केली असावी व ती खराब होऊ नये म्हणून त्वरित याचा वाटप करून होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्याचा प्रयत्न शासनाने केला असावा असे दिसून येत आहे. दोन महिन्यासाठी ज्वारीच का खरेदी केली? गहू महाग झाले कि नपरवडण्यासारखे होते? गहू च्या तुलनेत ज्वारी चे उत्पादन जास्त झाले का? कि शासनाने ज्वारी आयात करून काही घबाड तर केलं नाहीना? अशे अनेक प्रश्न जनतेमध्ये उपस्तित होत असून लोकांच्या जिभेला लागलेली गव्हाच्या पोळीची चव हि किमान दोनमहिन्यासाठी तरी आता भाकरीच्या चवीत बदलणार हे मात्र नक्की.