
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 4 मार्च 2025 रोजी
श्री सत्यसाई बहुउद्देशिय शिक्षणं व प्रशिक्षण संस्था संचलित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथे महिला व बालविकास मंत्रालयाच्या “बेटी बचाव, बेटी पढाओ” या उपक्रमाला १० वर्ष पूर्ण झाल्या संदर्भात या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मुलींच्या शिक्षणाचे आणि सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
त्याचप्रमाणे
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” उपक्रमाच्या अंतर्गत शालेय विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षा आणि जागरूकता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींमध्ये सायबर गुन्हे, ऑनलाईन सुरक्षितता आणि डिजिटल जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमात सायबर तज्ज्ञ कैलास शेंडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सायबर गुन्ह्यांचे प्रकार, सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराचे नियम, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. विद्यार्थिनींनी स्वतःच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलावीत, याबद्दल मार्गदर्शन मिळवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन ऑफ सी बी एस ई) होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सत्यवान सिंह दूहन होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रफुल चौथे हे होते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी समाजात मुलींना मिळणाऱ्या संधी, शिक्षणाचे महत्त्व आणि लैंगिक समानतेच्या गरजेवर प्रकाश टाकला.
मार्गदर्शन सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपल्या शंका मांडून विषयावर अधिक माहिती मिळवली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी, “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या मोहिमेचा प्रसार करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन ऑफ सी बी एस ई) यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवावा असे आवाहन केले.
