तहसील कार्यालय समोर न्याय व मागण्या पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे आमरण उपोषण उपोषण मंडपाला ठाणेदार संजय चौबे यांची भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी सर्कल मधील नागरिकांनी आपल्या न्याय व हक्कासंबंधी विविध मागण्या पूर्ण करण्याकरिता दिं ६ फेब्रुवारी २०२३ रोज सोमवार पासून तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांनी पुढील प्रमाणे मागण्यांकरिता उपोषणाला सुरुवात केली असून यात(१) स्वस्त धान्य दुकानातील शेतकऱ्यांचे बंद केलेले राशन धान्य सुरू करण्यात यावे (२) अतिवृष्टी व सततच्या नापिकेमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसनासाठी शासकीय स्तरावरून मदतीचे नियोजन करावे (३) वडकी येथील ग्रामीण रुग्णालयाकरिता त्वरित निधी उपलब्ध करून बांधकामाची सुरुवात करावी व तात्पुरत्या स्वरूपाचे रुग्णालय सुरू करण्यात यावे ( ४) देवधरी येथील सूतगिरणीचे काम त्वरित पूर्ण करून वचनपूर्ती करावी व परिसरातील बेरोजगाराचे समस्या सोडवावी (५) वडकी येथे जिल्हा परिषद शाळेत कनिष्ठ महाविद्यालय देऊन ग्रामीण भागातील मुलांची शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी (६) वडकी येथील राष्ट्रीय महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण व रस्त्यावर थाटलेली दुकाने त्वरित हटविण्यात यावे तसेच (७)कोथूर्ला ते आष्टोना रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण व रपटे बनून देण्यात यावे आधी विविध मागण्या शासन दरबारी पोहचून त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी यासाठी विनोद दादाजी भोयर, जगदीश रवींद्र गोबाडे, जीवन यादव गोहोकार, रामभाऊ विठ्ठल गाढवे, नारायण चंपत येरगुडे, सुरेश दादाजी येरगुडे, सौ. शालिनी नानाजी गोखरे सौ. प्रतिभा नथूजी नेहारे सौ.स्वाती अमोल ठाकरे, हनुमान लक्ष्मण डाहुले आदी नागरिक तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसले असून मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण करणार असल्याचे उपोषण कर्त्यांनी यावेळी सांगितले आहे.