

सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार,दिनांक 07/09/2025रोजी रविवार महाराष्ट्र राज्याचे मृद व जल संधारण मंत्री, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री.संजय भाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत, यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षिक व शिवसेना उपनेते माजी आमदार श्री.ज्ञानेश्वर धाणे पाटील साहेब पश्चिम विदर्भ समन्वयक परागभाऊ पिंगळे जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर भाऊ लिंगणवार,जिल्हा प्रमुख गजानन भाऊ डोमाळे यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्याचे सर्व विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांना पद वाटप करण्यात आले विशेष करून राळेगाव येथील राळेगाव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष जानराव गिरी यांना राळेगाव विधानसभा समन्वयक, माजी मुख्याध्यापक भानुदास राऊत यांना राळेगाव तालुका समन्वयक पदी, मनोज भोयर यांना तालुका प्रमुख पदी, इम्रान पठाण यांना राळेगाव शहर प्रमुख पदी,दिपक येवले यांना शहर संघटक पदी, राळेगाव नगरपंचायतचे नगरसेवक संतोष कोकुलवार यांची राळेगाव शहर समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली तसेच राळेगाव शहर ऊ बा ठा उपशहर प्रमुख जिवन जानरावजी रामगडे, शेख अनिस, मनीष साठे यांचा पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यात आला.कार्यकर्त्यांवर विविध जवाबदाऱ्या निश्चित करुन यवतमाळ जिल्हा परिषदेवर व नगरपरिषदेवर जिल्हातील विविध नगरपालिका, पंचायत समितीवर एकहाती शिवसेनेचा भगवा फडकविण्या साठी कामाला लागण्याचे आदेश दिले.
