
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेली श्रीरामपूर गट ग्रामपंचायत असून या गट ग्रामपंचायत मध्ये श्रीरामपूर (कोदुर्ली), कृष्णापूर गोपालनगर व शिवरा ही चार गावे असून या १५०० लोकवस्तीच्या गावाच्या विकासाची सूत्र माजी सरपंच सौ.जोस्नाताई कुमरे व उपसरपंच सदस्य तथा आजी सरपंच किसन झाडे ,उपसरपंच सौ.प्रतिभा तुरुचंद फुलमाळी सदस्य तसेच युवा ग्रामसेवक शंकर मुजमुले, यांच्या मदतीने गावात अभिनव उपक्रम राबवून श्रीरामपूर गट ग्रामपंचायतीची स्वच्छतेकडून समृद्धीकडे असलेली वाटचाल एखाद्या पर्यटन स्थळाला लाजवेल असे देखणे व आकर्षक असे दिसून येईल….
मागील काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या यात श्रीरामपूर गट ग्रामपंचायतिची ही निवडणूक झाली आणि निवडणुकीत नव्याने आलेले सरपंच किसन झाडे,उपसरपंच सौ.प्रतिभा तरुचंद फुलमाळी, व सदस्य यांनी सुद्धा “माझे गाव, सुंदर गाव, माझा सहभाग”. या नवोपराक्रमा अंतर्गत शासनाच्या विविध योजना व उपराक्रम राबवण्याचे उद्दिष्ठ ठरवून विकास कामास हात घातला आहे. जागतिक स्वरूपाचे महामारी नुकतीच भेडसावून गेलेली बघता गावाच्या स्वास्थ्य लक्षात घेत, गट ग्रामपंचायत मधील गावात सांड पाण्याचा निचारा, विल्हेवाट व गावातील लोकांना शुद्ध पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी जलशुद्धिकरण यंत्र बसविण्याचे महत्वाचे काम हाती घेतले असून तसेच या पूर्वी माजी सरपंच सौ. जोत्स्नाताई कुमरे यांनी सुद्धा पायाभूत सुविधेवर भर देऊन ग्रामपंचायत ला प्राप्त केंद्रीय वित्त आयोग, स्वनिधी व इतर योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधी अंतर्गत महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य व इतर या राखीव निधीतून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र कोदूर्ली, कृष्णापूर, या गावात गोपालनगर डिजिटल व बोलक्या करुन पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली,मौजा कोदूर्ली व कृष्णापूर या अंगणवाडी केंद्राला सोलर सिस्टीम लावून २४ तास विज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. कृष्णापूर या गावात लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात आले तसेच रिलायन्स फाउंडेशन कडून २००० लिटर पाण्याची टाकी बसविण्यात आली असून गोपालनगर शिवारात सिमेंट बंधारा बांधकाम करुन अशा एक ना अनेक प्रकारची कामे केली गेली आहे. नव नियुक्त सरपंच यांनी सुद्धा तोच ध्यास व नवीन उपक्रम डोळ्यासमोर ठेऊन गावाच्या व जनतेच्या हिताचे कामे करुन गावातील महिला,युवक यांच्यामध्ये विविध शासकीय योजना,उपक्रम कायदे, याबाबत जागरूकता व विकास कामात सहभाग मिळवण्यासाठी व संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.तसेच विविध उपक्रम व सहभागातून गावाला स्वच्छ, सुंदर, समृद्ध व स्वस्थ करण्याची कास धरली आहे
“शासनाचे सहकार्य व लोक सहभागाने समाजातील घटकाना गावापातळीवर विकास करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.गावाला समृद्धी कडे नेण्यास बांधील समजून सदैव तत्पर राहील.
▪️ किसन झाडे▪️
सरपंच ग्रामपंचायत,श्रीरामपूर
“शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातील लोकांना समजावून सांगून लोकांना वैयक्तिकरित्या त्यांच्या पर्यंत पोहचवीने याबाबत जागरूकता निर्माण करून शासन व गावकरी यांच्यातील दुवा म्हणून कार्य करीत राहील “
▪️शंकर मुजमुले▪️
सचिव,ग्रामपंचायत श्रीरामपूर
