
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रोगनिदान शिबिर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामिण रुग्णालय वणी येथे आयोजित करण्यात आले होते.
वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते रोगनिदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख विनोद मोहितकर, बीजेपीचे दिनकर पावडे, किशोर नांदेकर, राजू तुराणकर, टिकाराम खाडे, ललित लांजेवार डॉ के.झेड.पोहे.वैद्यकिय अधिक्षक, डॉ महेंद्र लोढा, डॉ.भालचंद्र आवारी नोडल अधिकारी, ग्रामिण रुग्णालय वणी, डॉ मांडेकर इत्यादी डॉक्टर यांच्या उपस्थितीत. या शिबिरात 495 पुरुष तर 375 महिला रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले .
यावेळी परिचारिका, आशावर्कर, दवाखान्यातील सर्वं कर्मचाऱ्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रुग्ण तपासणी शिबिराचे उदघाटन प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी उपस्थित रुग्णांसी संवाद साधत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले व उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना शक्य तेवढी उत्तम आरोग्य सेवा देण्याचे आवाहन केले.
