
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती युवा बहुउद्देशीय संस्था धानोरा यांच्या अंतर्गत परिसरातील जनतेकरीता मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आज दिं १३ फेब्रुवारी २०२३ रोज समोवारला करण्यात आले आहे.
या मोतीबिंदू शिबिराला डॉ विलास मून (नेत्रचिकित्सा अधिकारी घाटंजी) डॉ प्रशांत उमरे नेत्रचिकित्सा अधिकारी राळेगाव तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ गोपाळ डॉ.पाटील जयपाल पाटील (एम ओ) श्रीमती शारदा मांडवकर (एल एच व्ही) श्रीमती मंदा हेमने (एल एच व्ही )श्रीमती रजनी कदम (ए एन एम) श्रीमती रीना आत्राम (औषधी निर्माता) सौ शितल दाते (डाटा ऑपरेटर )खांदवे सर (एच ए )पतंगे सर (एच ए )आकाश खेडेकर (परिचर )नितीन धोटे(वाहनचालक) सीता नेहारे (मदतनीस) आणि धानोरा प्राथमिक केंद्रातील सर्व कर्मचारी टीमचे सहकार्य लाभणार असून या सर्वांच्या मदतीने शिवशक्ती युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने धानोरा गावात प्रथमच भव्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ ज्या रुग्णांना घ्यायचा आहे अशा रुग्णांची
मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये तपासणी होऊन रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया ची गरज आहे परंतु ते जिल्हास्तरावर जाऊन शस्त्रक्रिया करू शकत नाही त्या रुग्णांसाठी विशेष तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करून शस्त्रक्रिया केली जाईल तसेच शिबिरामध्ये मोतीबिंदू व डोळ्याचा इतर आजाराचे निदान व उपचार करण्यात येईल शिबिरात रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल शिबिरातील रुग्णांना मोफत औषधी देण्यात येईल तरी या शिबिरात रुग्णांनीची तपासणीची व भरतीची वेळ सोमवार दि १३ फेब्रुवारी २०२३ सकाळी १०:०० ते २:०० या वेळात प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा येथे करावे या शिबिरामध्ये ज्या रुग्णांनी प्रथम नोंदणी केली अशा रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल रुग्णांनी शिबिरामध्ये येताना आपले आधार कार्ड सोबत आणावे शिबिरातील रुग्णांची भोजन व्यवस्था करण्यात येईल ज्या रुग्णांना शिबिराचा लाभ घ्यायचा आहे अशा रुग्णांनी बाबाराव घोडे सर ९३५९२५५१६३ सुहास मुडे ९३५९०३६५८९ गजानन सुरकार ८८०५९०४९४८रवी परचाके ९५५२२८६०७९ गणेश वरुडकर सर ७७९८१६२३०० संजय बडवाईक ९३२५७०९०४६ स्वप्निल भोयर ९६५७७१३७४५ आकाश खेडेकर ९५५२३०३७१८ या फोन नंबर वर संपर्क करून आपली नोंदणी करून या भव्य मोतीबिंदू शास्त्र शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवशक्ती युवा बहुउद्देशीय शिक्षण संस्था व समस्त गावकरी यांनी केले आहे
