
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथे ग्रामीण रुग्णालय येथील ट्रामा केअर युनिट येथे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रगट दिना निमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी दरवर्षी प्रमाणे गजानन महाराज प्रगट दिना निमित्त भक्ता करिता महाप्रसादाचे आयोजन रुग्णालय उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. यावर्षी प्रगट दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येऊन यामध्ये राळेगाव परिसरातील 29 गजानन महाराज भक्तांनी रक्तदान केले….
यावेळी रक्त संक्रमण अधिकारी- डॉ.इरफाण तुघलक
, समाजसेवा अधिक्षक (वै)- .आशिष खडसे
,अधिपरीचारक- मोहन तळवेकर, तंत्रज्ञ- मधुकर मडावी, पंकज खंडारे.
,परिचर- .रामदास आगलावे
दानिश, अनिकेत
संजय नेमाडे तसेच ग्रामीण रुग्णालय गजानन महाराज उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते….
