ढाणकी शहरात बेकायदेशीर रित्या सिंधीदारूचा साठा करणाऱ्यास बिटरगाव(बू )पोलिसांनी केले जेरबंद


प्रतिनिधी:: यवतमाळ
ढाणकी.


गेल्या काही दिवसांपासून बनावट दारू विक्री होत होती व त्यानुसार बिटरगाव(बू) पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई पण केली होती असे असताना सुद्धा गेल्या काही दिवसांपासून एक इसम वेळोवेळी पोलिसांना गुंगारा देऊन अवैध घातक रसायन मिश्रित सिंधी दारू विकून अनेक जणांना विशेष करून तरुणांना याचे व्यसन लावले होते तेव्हा बनावट व शरीरास हानिकारक असलेल्या दारू विकणाऱ्या व्यक्तीला जेरबंद करून कारवाई करणे अत्यंत जिकिरीचे बनले होते तसेचअवैध दारू आणून विकणाऱ्यांचे मनोबल उंचावले होते पण बिटरगाव पोलिसांनी आपली कार्यतत्परता लगेच अमलात आणून एका अवैधरित्या सिंधी दारू बाळगणाऱ्यास विक्री करणाऱ्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला.

दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक २५/५ /२०२३ ला ढाणकी शहरातील भीमनगर येथील नामे संजय चंपत कांबळे हा सिंधी बनावट व शरीरास हानिकारक दारू बाळगत असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ही अवैध दारू एका पत्र्याच्या शेडमध्ये साठ्याच्या स्वरूपात आढळली असून ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ऊप नी.कपिल मस्के, पो. कॉ.निलेश भालेराव,सतीश चव्हाण, प्रवीण जाधव,चाटे, यांनी ही कार्यवाही करताना १०० लिटर दारू जप्त केली असून त्याची किंमत २५०० रु एवढी असताना हा इसम अवैधरित्या सिंधी बाळगताना आढळून आला ही कारवाई करताना पंचा समक्ष झडती घेतली असता शेडच्या एका कोपऱ्यात पांढऱ्या रंगाच्या पोत्यात ही दारू आढळून आली संबंधित अवैधरित्या बनावट दारू साठा करणाऱ्या वर व विकणाऱ्यावर व बिटरगाव(बू) पोलिसांनी महाराष्ट्र दारू बंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.