
.
नितेश ताजणे -वणी
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वणी यांचेकडील अधिसूचना २०२३, दिनांक ०७/०२/२०२३ अन्यये श्री धनलक्ष्मी महिला नागरी. सहकारी पतसंस्था मर्या. वणी र.नं. ११६२, ता. वणी जि. यवतमाळ या संस्थेची नवनिर्वाचित संचालक समिती अधिसूचित केले होते.त्यानुसंगाने श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी र.नं. ११६२, ता. वणी जि. संस्थेच्या नवनिर्वाचित व्यवस्थापक समिती सदस्यांची पदाधिकारी निवडीची सभा दि. १५/०२/२०२३ ला संस्थेचे कार्यालय जटाशंकर चौक वणी या ठिकाणी एस. के. पिसाळकर निवडणूक निर्णय अधीकारी यांचे अध्यक्षतेखाली व व्यवस्थापक अतुल कवडू मुठ्ठावार यांचे निरीक्षणात घेण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी आरती चौधरी तर उपाध्यक्षपदी पुजा जुनगरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्ष पदी आरती संजय चौधरी व उपाध्यक्ष पदी पुजा जगन जुनगरी यांची सर्व संचालकांनी एक मतानी बिनविरोध निवड करण्यात आली.
तर संचालक पदी सिमा विजय चोरडिया,सोनू राजेंद्र मदान, गीता राजू तुराणकर, वंदना प्रविण राजूरकर, मंजुताई अनिल बोलोरिया, सरोज संतोष कोणप्रतिवार ,ताई कवडुजी मुठ्ठावार , संगिता अनिल खंगार, पल्लवी प्रशांत उदापूरकर , सविता अरविंद राऊत, सुषमा राजु येवले यांची एकमताने निवड करण्यात आली.
