आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पत्रकार विलास मोहिनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, विलास मोहीनकर यांचे वर विविध गुन्हे दाखल

प्रतिनिधी:गुरुदास धारने

चिमूर येथील हिलींग टच हास्पिटल ला जिल्हा प्रशासनाने डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर मान्यता दिली असताना चिमूर येथील पत्रकार विलास मोहिनकर यांनी समाज माध्यमात खोटी माहिती पसरवून हास्पिटल ची बदनामी केली असल्याने हिलींग टच हास्पिटल चे सीओ साईनाथ बुटके यांनी चिमूर पोलीस स्टेशन ला तक्रार केली असता पालकमंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेटीवार यांचे कडे दिलेल्या निवेदनातून विलास मोहिनकर यांचे वर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी हिलींग टच हास्पिटल चे सीओ साईनाथ उर्फ अश्वमेघ बुटके, डॉ अभिषेक निमजे डॉ सुधीर बुटके यांनी केली आहे

सध्या कोविड प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असून शेकडो रुग्ण मृत्युमुखी पडत आहे तेव्हा राज्य शासन व आरोग्य विभाग प्रयत्न करून कोविड चा सामना करीत आहे त्यात डॉक्टर ,नर्स व आदी कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड चा सामना करीत आहे
चिमूर येथील हिलींग टच मल्टिस्पेशालिस्ट हास्पिटल ला प्रशासनाने डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर म्हणून मान्यता मिळाली असून रुग्ण उपचार करीत आहे त्यात हास्पिटल मधील डॉक्टर ,नर्स व आदी कर्मचारी प्रयत्नांची शिकस्त करीत आहे आपत्ती जनक स्थितीत बाधित रुग्णांवर उपचार करीत सेवा देत आहे प्रशासनास सहकार्य करीत आहे
अश्या आपत्ती जनक स्थितीत सामाजिक दायित्व न ठेवता विलास मोहिनकर यांनी दि 23 एप्रिल रात्रौ 11.30 वाजता दरम्यान दवाखान्यात मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना धमकावून दवाखान्याची ची तोडफ केली