
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सरई येथे अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात सरपंचासह व गावातील महिलानी दिं ५ जून २०२३ रोज सोमवारला धडक दिली असून गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
गावात बेकायदेशीर रित्या अवैध दारूविक्री सुरू असून गावातील लहान मुले तर प्रौढ व्यक्ती मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेले असून या दारूमुळे घरातील पती पत्नीत वादविवाद होत आहे त्यामुळे गावातील सदर दारू विक्रते नामे पंडित दिगंबर नेरूले हे बऱ्याच दिवसापासून गैरकादेशीर रित्या दारू विक्री करीत असून या दारूविक्रेत्याला गावातील तंटामुक्त अध्यक्ष सरपंच पोलीस पाटील तसेच गावकरी यांनी बंद करण्यासाठी वारंवार सांगून सुद्धा देशी दारू बंद केली नसल्याने अखेर गावातील महिला दारूविक्रेत्यांच्या विरोधात एकवटल्या असून गावातील अवैध दारूविक्री कायम स्वरूपी बंद करण्यात यावी या आशयाचे निवेदन पोलीस स्टेशनला देण्यात आले यावेळी सरपंच किशोर अण्णाजी हिवरकर, कुसुमबाई रमेश फरकाडे, शोभा पंढरी टोपलमोडे, शोभा रामदास कोपरे, लता अशोक हिवरकर,शरला विलास येपारी, चंदा रंगराव वाकुलकार, मंगला महादेव मेश्राम, शोभा जनार्दन रोहणे, वंदना राजू राऊत, प्रीती ज्ञानेश्वर नांदे, चंद्रकला संजय येपारी, नलू बंडूजी आंबटकर आदी महिला उपस्थित होत्या
