के .बी.एच विद्यालय पवन नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित के .बी.एच विद्यालय पवन नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी….
आज दि.१९/०२/२०२३ रोजी. के. बी.एच विद्यालय पवन नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुख्याध्यापक श्री आप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. बी. व्ही पवार होते व उप मुख्याध्यापिका युगंधारा देशमुख पर्यवेक्षक श्री. उमेश देवरे सर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता काकळीज या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आला. सुरुवातीलाच इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. सई सोनवणे या विद्यार्थिनीला तिच्या उत्कृष्ट भाषणामुळे घोलप मॅडम यांनी रोख पारितोषिक दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी केलेल्या व समाजकार्याविषयी सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली. तसेच विद्यालयाचे उपशिक्षक श्री. नितीन पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेला इतिहास व इतिहासातील केलेल्या कार्याचे व समाज परिवर्तनाचे कार्य याविषयी सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्याची माहिती देताना छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तन व जनतेची सेवा याविषयी माहिती दिली..या कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय पवार यांनी केले. व आभार कविता सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र गीत गायन करून झाला.