ढाणकीला तालुक्याचा दर्जा मिळाला पाहिजे :आमदार नामदेव ससाणे साहेब यांचे उप मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस साहेब यांना निवेदन


उमरखेड तालुका प्रतिनिधी : विलास राठोड (ग्रामीण )


उमरखेड तालुक्यामधील ढाणकी नगर पंचायत ला अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाचा दर्जा मिळण्यात यावा आशी मागणी माननीय श्री नामदेव ससाणे साहेब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदनातून निवेदन केले आहे. ढाणकी नगर पंचायत हा तालुका साठी दर्जा मिळावा यासाठी वारंवार मी पाठपुरावा करत आहे ढाणकी नगर पंचायत मधील छतीस हजार एवढी लोकसंख्या असून नगर पंचायर ला अतिरिक्त तहसीलदार दर्जा मिळाला तर माझ्या मतदार संघतील बंदी भागातील नागरिक लोकांना खूप मोठया प्रमाणावर फायदा होऊ शकते उमरखेड तालुक्यात बावीस वन गावे असून तेथील लोकांसाठी काही कागदोपत्रीसाठी उमरखेड येथे जावा लागतो जर ढाणकी या कार्यालयाचा दर्जा मिळाला तर संपूर्ण इतर लोकांना व विध्यार्थना फायदा होऊ शकेल दिलेल्या अस्वसनाची लेखी पूर्तता होणार आहे