

वरोरा :- वरोरा शहरातील गांधी चौक येथील कापड व्यावसायिक प्रवीण जी रामकृष्ण वाभीटकर, रा. कर्मवीर वार्ड वरोरा यांचा आज दि. 10 जुलै रोजी सकाळी 11:30 सुमारास शेंबळ या गावाच्या पाटीजवळ मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतक प्रवीण रामकृष्ण वाभिटकर हे वणी येथील नातेवाईकांच्या तेरवी साठी घरून निघाले रस्त्यात पडणाऱ्या शेंबळ या गावी त्यांचे मामा राहत असल्याने त्यांना सोबत घेऊन कार्यक्रमासाठी जावयाचे होते. म्हणून शेंबळ या गावाच्या पाटीजवळ त्यांनी आपली दुचाकी गाडी वळवली असता मागून येणाऱ्या चार चाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच व्यवसायिक, मित्र गनांमध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
