मेट गावात बंजारा लेंगी आणि डान्स करून केला होळी सण साजरा!

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका
प्रतिनिधी: संदीप बळीराम जाधव


उमरखेड तालुक्यामध्ये मेट हा तांडाआहे. तांडा म्हटलं की तिथं नायक (मुखिया), कारभारी, व असामी व सुसज्ज लोक अशी एक कमिटी नेमलेली असते. त्यामध्ये नायक भूमिका म्हणजे न्यायाधीश अशी असते, सण म्हटले की नायकाच्या सहमतीने साजरे होतात. लोक नायकाच्या शब्दाचे मोल करतात. खरंतर या कमिटीमध्ये झगडे, तंटे, आपसी मामला, विवाहित मुलींना होणारे सासरचेत्रास, व अनेक केसेस पोलीस स्टेशनला न जाऊ देता, गावातच या कमिटीद्वारे नसाब सेवालाल मंदिराच्या सभा मंडपामध्ये दोन्ही पक्ष बसून नायक कमिटी च्या न्यायाने या सभेत न्याय मिळतो.
हे फक्त बंजाराच्या तांड्यामध्येच आढळते. सर्व बंजारा बांधव एकत्र येऊन, संपूर्ण सण साजरा करतात. त्यामध्ये डफली वाजून, होळीभोवती नृत्य व लेंगी घालून, समाजातल्या नायक विषयी, व सेवालाल विषयी, आमचे नायक वसंतरावजी नाईक व माहूर गडावरील रेणुका, अनुसया देव देव सरी दत्तात्रेय या देवाच्या रचनात्मक गाण्याने बंजारा बोलीभाषा मध्ये जल्लोष करतात. लोकांची टीम माहुर गडावर ती जाऊन लेंग्या घालून सर्व देवाजवळ नृत्य करतात. व ते रात्रीची होळी माहूर येथे करतात, त्यानंतर सकाळची होळी आपापल्या तांड्यात करतात. व दुसऱ्या दिवशी रंगपंचमी, माता बहिणी तसेच मित्र मैत्रिणी अंगाला व चेहऱ्याला रंग फासून साजरी केली जाते, व तिसरा दिवस म्हणजे, कर हे एकत्र येऊन साजरे करतात. या होळीच्या दिवशी वर्षभरात जे लोक अंतिम क्षणाला पार झालेत, त्यांच्या घरी लेंगी व नृत्य करून, त्यांना सण साजरा करण्यास मोकळे करतात.

तांड्यातील मुखिया वर्ग श्री माननीय प्रेमसिंग मंगलसिंग नाईक, कारभारी मोहन राठोड, असा मी थावरा चव्हाण हे तीन मुख्य लोक असतात.
व ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रवीण ताई विक्रम राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सैनिक श्री उत्तम मोहन सिंग राठोड, सर्व ग्रामपंचायत सदस्य व संपूर्ण गावकरी बांधवांच्या सहकार्याने होळी सण साजरा झाला.