वसंतराव नाईक कृषी विद्यालय बिटरगांव ( बु ) येथे विद्यालयात सेवा निवृत्त प्राचार्य व सेवक यांचा सपत्नीक सेवापुर्ती सत्कार समारंभ

बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी//शेख रमजान

वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव ( बु ) येथील प्राचार्य जी.पी.भगत व सेवक भिमराव बल्लाळ हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याप्रित्यर्थ वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव ( बु ) येथे निरोप व सपत्नीक सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सर्वे प्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर व शिक्षण महर्षी स्व.ल.ह.एडतकर सरांच्या यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.व नियत वयोमानानुसार प्राचार्य जी.पी.भगत सौ दैवशीला भगत तसेच भिमराव बल्लाळ व सौ शिला बल्लाळ यांचा सपत्नीक सेवापुर्ती शाल श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सत्कार केला.यावेळी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुंजाराम संभाजी डोंगे व्यवस्थापक तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बी.जी.राठोड माजी शिक्षण सभापती यवतमाळ व शिक्षण संस्थापक , अनिल चेंडकाळे सर पत्रकार संघाचे अध्यक्ष व संस्थेचे कार्यवाहक, सत्कारमुर्ती जी.पी भगत व सौ.दैवशिला भगत तसेच भिमराव बल्लाळ व सौ शिला भिमराव बल्लाळ , मिलिंद कांबळे, राठोड सर पांडुरंग भगत . सौ दुधे मॅडम प्राचार्य डि.एम.खर्चे हे उपस्थित होते .सत्कारमूर्ती सेवानिवृत्त प्राचार्य जी.पी.भगत व भिमराव बल्लाळ सेवक यांचा यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी सेवेचा आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव करीत असताना त्यांचा सेवा निवृत्तीचा काळ अगदी मजेत, आनंदात जावो, त्यांना व त्यांच्या परिवाराला चांगले आरोग्य लाभो यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.
माणसाच्या जीवनात आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी त्यांनी सदैव वाटचाल करावी, शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव तत्पर राहुन या दुर्गम भागातील बंदिभागात शिक्षण महर्षी स्व.ल.ह.एडतकर सरांनी सर्वाना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.यामध्ये सर्व धर्मीय विद्यार्थाना उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून दिली व माणसाच्या जीवनाचे सार्थक करणे हे केवळ माणसाच्या हातात असून ते त्यांनी परिपूर्ण करावे तसेच चांगल्या गुणाचा विचार करून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा असे निरोप तथा सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे माजी शिक्षण सभापती यवतमाळ बी.जी.राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच संस्थेचे कार्यवाहक अनिल चेंडकाळे सर पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी प्राचार्य जी.पी.गभत व भिमराव बल्लाळ यांनी केलेल्या संस्था व विद्यार्थी घडविण्याचे कार्य व शैक्षणिक कार्याचा भाषणातून गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविहक व सत्कारमूर्तीचा परिचय विद्यालयाचे प्राध्यापक व अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे सचिव संतोष आंडगे यांनी केले., कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल माने यांनी केले तर आभार कु.पुजा मस्के यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता सर्व प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.