
यवतमाळ/ प्रतिनीधी :-
प्रवीण जोशी
तालुक्यातील बंदी भागात येत असलेल्या जेवली गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत २९८ अवैध बोगस खताचा साठा रुपये ३ लाख ७९ हजार ९५० दिनांक ५ जून रोजी जप्त केला होता. या प्रकरणी पं. स. कृषी अधिकारी अतुल कुमार कदम यांच्या तक्रारीवरून बिटरगाव पोलिसांनी दोघा विरोधात गुन्हा दाखल केला असून, यापैकी एकास अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीस आज न्यायालयात दाखल केले असता, एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
उमरखेड तालुक्यातील जेवली गावात काल दिनांक ५ जून रोजी बोगस खत विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ आर. व्ही. माळोदे, पंचायत समिती कृषी अधिकारी अतुल कुमार कदम तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण के. एस. पाटील यांनी सदर खताच्या गोडाऊनवर धाड टाकली. त्यावेळी त्या ठिकाणी नागपुर येथील कंपनीचा अॅग्री फोर्स रत्ना या नावाचे २९८ डीएपी खत बॅगा आढळून आल्या. खत विक्रेता कोणताही परवाना नसताना त्याच्याकडून खत विक्री केल्या जात होते . या प्रकरणात कृषी अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बिटरगाव येथे, ॲग्री फोर्स बायो इंडस्ट्रीज चे मॅनेजिंग डायरेक्टर व खत विक्रेता संकेत युवराज इंगोले राहणार बिटरगाव यांचे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी संकेत युवराज इंगोले यास अटक केली असून, त्यास आज ६ जून रोजी उमरखेड न्यायालयात नेले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली असून, दुसरा आरोपीस अद्याप पोलिसांनी अटक केली नसून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बिटरगाव चे ठाणेदार प्रताप भोस करीत आहेत.
तसेच अशा प्रकारचा अवैध खत साठा ढाणकी शहरात आढळण्याची दाट श्यक्यता असुन, कृषी अधिकारी यवतमाळ हे यावर अॅक्शन घेणार का ? याकडे ढाणकीवासीयांचे लक्ष लागले आहे.
