
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 5 नोव्हेंबर रोजी गांधी ले आऊट च्या पटांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची जंगी जाहिर सभा त्यांचे पक्षाचे उमेदवार श्री अशोक मारुती मेश्राम यांच्या समर्थनार्थ आयोजित केली आहे.
तरुणांचे गळ्यातील ताईत,महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व या सभेतून उमेदवार कसा असावा यावर मार्गदर्शन करणार आहे..आज मिडिया समोर बोलताना मनसे राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ एबंडवार, 77, राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक मारुती मेश्राम यांनी ही माहिती दिली…..
जुनी पेन्शन, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, अनेक प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी राजसाहेब येत आहे,जनतेनी या सभेला त्यांचे विचार ऐकण्यासाठी यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
