
उमरखेड तालुका प्रतिनिधी : विलास टी राठोड (ग्रामीण )
महिला दिनाचे औचित्त साधून बिट जमादार विद्या राठोड व सुनिता शिंदे याचा शाल व शिफळ देऊन त्याचा सन्मान करण्यात आला . एक दिवसीय बिटरगाव पोलिस स्टेशन ठाणेदार पदाचा चार्ज विद्या राठोड यांना देऊन ठाणेदार प्रताप बोस साहेब निरीक्षक यांनी त्यांचा सन्मान केला व तसेच पोलिस उपनिरीक्षक कपिल मस्के साहेब यांनी आपले एक दिवसीय पद चार्ज सुनीता सिंदे यांना देऊन त्याचा जागतिक महिला दिन हा महिल्याचा सन्मानाचा दिवस आहे देशासाठी व समाजासाठी महिलांचे खूप मोठे योगदान असून त्यांचा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो आपल्या सहकारी महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे कार्य करण्याचे मनोबल वाढवे ह्या हेतूने पोलिस स्टेशन बिटरगाव यांचे ठाणेदार प्रताप बोस साहेब पोलिस निरीक्षक व तसेच उपनिरीक्षक कपिल मस्के साहेब यांनी एक दिवसीय चार्ज देऊन पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान केला .या वेळी कार्यक्रमास पोलिस कर्मचारी अतिश जारंडे, देविदास हक्के, दत्ता कुसराम, नरेंद्र खामकर, दत्ता कवडेकर, प्रकाश केंद्रे, होमगार्ड प्रकाश गायकवाड, गजानन पेंढे, चंद्रमुनी वाढे, संतोष चव्हाण, अनिल काळबांडे, पोलिस पाटील सावळेश्वर हे उपस्थित राहून एक दिवसीय ठाणेदार चार्ज देऊन पोलिस स्टेशन बिटरगाव येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला.
