
सहसंपादक: -रामभाऊ भोयर
ग्रामीण भागातील गोरगरीब तथा शहरी भागातील बहुतांश घरी सिलेंडरचे दर गगनाला भिडल्याने सिलेंडरच्या महागाई पेक्षा चुलीचा धुरच बरा म्हणत महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळल्या असुन रिकामा सिलेंडर अडगळीत गेला असल्याने शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीप्रमुख वर्षाताई मोघे यांच्या नेतृत्वात बोरी इचोड या गावात निषेध व्यक्त करण्यात आला.
दिवसेंदिवस होत असलेली सिलेंडर दरवाढ ही सर्वसामान्याना आर्थिक दृष्ट्या न झेपणारी आहे. यावर्षी महापुराने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थती असुन शेतकरी शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट माहिला आघाडी च्या वतीने बोरी इ इथे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुका संघटीका वर्षाताई मोघे तसेच तालुका प्रमुख विनोद काकडे शाहर प्रमुख राकेश राहुलकर उप तालुका प्रमुख शेशेराव ताजने दिनेश काळे शरद सराटे हेमंत वाबिटकर यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.
