
नियमित कर्जदाराना दिलासा देण्यासाठी शासनाकडून पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे ठरले त्यापैकी काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले पण काही शेतकरी अद्यापही या अनुदानापासून वंचित असल्याने व पुढे 31 मार्च असल्याने प्रोत्साहन पर अनुदानाचे 50 हजार रुपये द्या हो असे म्हणण्याची वेळ अनुदानापासून वंचित शेतकऱ्यावर आली आहेत . थकीत कर्जदारांना दिलासा म्हणून वेगवेगळ्या कर्जमाफी योजनेतून त्यांच्या कर्ज माफ करून अशा शेतकऱ्यांना नियमित कर्जवाटप करण्यात येत आहे हे करीत असतानाच नियमित कर्ज दारामध्ये आपण नियमित कर्ज भरतो तर आपण चूक करतो काय अशी भावना तयार होते. त्यामुळेच नियमित कर्जदारांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून दिलासा म्हणून 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे शासनाने ठरवले .काही शेतकऱ्यांना ते अनुदान मिळाले हे पण अजून बरेचसे शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पर्यायाने ग्रविकाचे बरेच शेतकरी आहेत राळेगाव ग्राविकाच्या 267 पात्र शेतकऱ्यांपैकी 135 शेतकऱ्यांच्या खात्यात कमी अधिक प्रमाणात या अनुदानाची रक्कम जमा झाली आहेत. तर अद्याप पर्यंत 132 शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही या अनुदानाची रक्कम जमा झालेले नाही. काही दिवसावर 31 मार्च येऊन ठेपला आहेत ग्रा विकाच्या कर्जदारांना 31 मार्चपर्यंत कर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज लागतं त्यामुळे ग्राविकाचे बहुतांश शेतकरी 31 मार्चपर्यंत कर्ज भरण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेस शासनाने वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ 50 हजार रुपये जमा केल्यास असे शेतकरी आपल्याकडील कर्ज त्वरित भरू शकतात व ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नियमित राहू शकतात ज्या शेतकऱ्यांचे नावे या यादीत आहेत पण अजून पर्यंत ही ज्या शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही असे शेतकरी या मदतीची वाट पाहत आहे . शासनाने ही मदत त्वरित जमा केल्यास शासनाच्या मदतीचे पैसे व उर्वरित पैसे टाकून आपल्याकडील कर्ज भरावे अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहेत . त्यामुळेच असे शेतकरी आतुरतेने पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानाची वाट पाहत आहेत 31 मार्च पूर्वी प्रशासनाने पात्र प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान जमा केल्यास शेतकरी थकीत राहणार नाही .ग्रा विकाची वसुलीही होईल शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात 31 मार्चपूर्वी 50 हजार रुपये जमा न केल्यास ग्राविकाचे शेतकरी कर्ज भरणार नाही पर्यायने थकीत कर्जदाराचे संख्या वाढेल व ग्राविकाचे पर्यायाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वसुली होणार नाही थकीत कर्जदारांचे संख्या कमी करायची असल्यास व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वसुली होण्याकरता तरी शासनाने नियमित कर्जदाराच्या खात्यात 50 हजार रुपयांचे अनुदान जमा करणे गरजेचे आहे.
