
उमरखेड तालुका प्रतिनिधी,:विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
गेल्या तीन वर्षापासुन उमरखेड तालुक्यातील वनक्षेञ असलेले 62 गावाला सामुहीक वनहक्क दावे मिळावे या करीता,मा.आयुक्त साहेब, मा.जिल्हाअधिकारी अमोल येडगे साहेब,
यांच्या मार्गदर्शनाखाली ,अनुसुचित जमाती अधीनियम 2006 व नियम 2008 व सुधारित नियम 2012 नुसार वनहक्क दावे मिळण्यासाठी संपुर्ण प्रक्रिया केली असुन आज रोजी एकुण 43 गावांना वनहक्क जमीनी मिळाल्या आहेत. या मिळालेल्या सामुहीक वनहक्क जमिनीवर गाव वाकास आराखडे तयार करण्या करिता FES व दिलासा संस्थेच्या सहकार्याने गाव आराखडे तयार करण्याकरिता ठिक ठिकाणी प्रभाग स्तरावर ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील,रोजगार सेवक,ग्रामपंचायत सदस्य, महीला सदस्य यांचे फिल्ड ट्रेनर शेवंतराव गायकवाड यांच्या माध्यमातुन क्षमता बांधणी प्रशिक्षण घेऊन त्यांचे अधिकार,हक्क , कर्तव्य,निसर्गाचे संवर्धन व संरक्षण याची जाणीव करत असल्याने निसर्गाचे संरक्षण व संवर्धन विषयी जणजागृती होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गांवातील नागरिकांचा मोठा प्रतीसाद मिळत आहे. या पविञ कार्यात मा.प्रकल्प आधिकारी आदिवासी विभाग,उपविभागिय अधिकारी मा.व्यंकट राठोड साहेब, तहसिलदार साहेब,गटविकास अधिकारी साहेब सहकार्य करत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतीनिधी सहभागी होऊन या ऊपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे“
