
. हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील कुस्ती स्पर्धा भरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यंदा सरसम गावांत दि २ मार्च रोजी भव्य अशा जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले, 5555 रुपये पर्यंतचे बक्षिस ठेवण्यात आले आहेत. या जंगी कुस्ती स्पर्धेत मोठ्या संख्येने मल्लांनी सहभागी व्हावे असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
गावकरी मंडळी यांनी गावातील सर्वांना सोबत घेऊन एक कमिटी स्थापन केली. व दरवर्षीप्रमाणे वर्षी वर्षीपासून औचित्य साधून कुस्तीचा आखाडा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. यंदा सरसम गावामध्ये शनिवार दि २ मार्च रोजी भव्य अशा जंगी कुस्तीच्या आयोजन करण्यात आले आहे. (कै प्रकाशराव विठोबा वानखेडे यांच्या स्मरणार्थ )अँड अतुल प्रकाशराव वानखेडे यांच्या कडून प्रथम क्रमांसाठी 5555 रुपये बक्षिस ठेवण्यात आले आहे.व (कै माधवराव गोविंदराव ढेमकेवाड यांच्या स्मरणार्थ) श्री रमेशराव माधवराव ढेमकेवाड (सहशिक्षक) यांच्या कडून दुसरे बक्षीस 3333 रू आहे .व तीसरे बक्षीस गणेश साईनाथ दारपवाड यांच्या कडून 2222 रू प्रत्येकी ठेवण्यात आले. व सरसम गावातील कमटीचे अध्यक्ष श्री नामदेव गंगाराम डाके, उपाध्यक्ष काशीनाथ रामजी मंडलवाड सचिव संजय बाबुराव पसलवाड तसेच कुस्ती कमिटी अध्यक्ष साईनाथ लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष रमेश माधवराव ढेमकेवाड ( सहशिक्षक) सचीव केशव विठ्ठलराव मंडलवाड, सल्लागार,उत्तम पोशटी मंडलवाड तसेच पहिलवान पाहून योग्य कुस्ती लावण्यात येईल.स्थळ श्री बसवेश्वर मंदिर सरसम ( बु) ता हिमायतनगर जि नांदेड समस्त गावकरी मंडळी
