भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा यांच्यामुळे आमदार नजरधने यांची उमेदवारीची वाढली चिंता?

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी.जाधव


उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कधीकाळी पक्षातील विरोधक आता जिल्हा अध्यक्ष झाल्याने नजरधने यांची चिंता वाढली आहे. तर नुकतेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री नितीनजी भुतडा यांचे कट्टर समर्थक असलेले, उमरखेडचे नगराध्यक्ष आमदार श्री नामदेव ससाने यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने आमदार नजरधनेची अडचण वाढली आहे. नितीनजी आणि नजरधने यांच्यातील मतभेद काही नवीन नाहीत, विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उमरखेड मध्ये झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यक्रमात नजरधने आणि भुतडा यांच्यातील मतभेद चर्चेचा विषय मानला जात आहे. नुकतेच आता उमरखेड मतदार संघात राजकीय बदलाचे समीकरण वाढू लागले.
नजरधने यांच्याशी मतभेद झाल्याने भुतडा यांनी आपली रसद ससाणे यांच्या मागे उभी केली आहे. तर ससाने यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
नितीन भाऊ का आशीर्वाद म्हणता, ससाने कामाला लागले आहेत. त्यातच भुतडा यांचा पक्षात वजन आहे, थेट वर्षापर्यंत त्यांचे सलोख्यांचे संबंध आहे. त्यामुळे आमदार राजेंद्र जी नजरधने यांचां पत्ता कापण्यात येते की काय अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे, आणि खुद नजर धने यांची सुद्धा चिंता वाढलेली आहे.