
पोंभुर्णा तालुक्यातील 38 शेतकऱ्यांचे धान खरेदी प्रकरणात एका संस्थे कडे तब्ब्ल 23 लाख एवढी रक्कम असून ती देण्यासाठी टाळाटाळ होत होती. शेतकऱ्यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार वने सांस्कृतिक मत्स्य कार्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री यांची भेट घेऊन आपबीती सांगितली ,त्यावर सुधीरभाऊनी तात्काळ दखल घेतली. 8 एप्रिल ला सर्व शेतकऱ्यांना पोलीस स्टेशन मार्फत पैसे परत देण्यात आले. शेतकऱ्यांनच्या घामाचे कष्टचे पैसे वापस मिळाल्याचा आनंद झाला आणि शेतकऱ्यांनी त्या आनंदाचे वाटेकरी सुधीरभाऊ आहेत असे सांगत भाऊंचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शेतकरी वसंत पोटे पाटील यांनी भाऊ आमच्या पाठीशी होते म्हणून आम्ही जिंकू शकलो असे मत व्यक्त केले तसेच मोरेश्वर धोडरे यांनी सांगितले की आम्हांला पैसे परत मिळतील की नाही ही आशा सोडली होती परंतु भाऊंनी आम्हांला वारंवार सांगितलं तुमचे पैसे भेटून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज आनंद होत आहे मत व्यक्त केले प्रफुल रोहनकर यांनी सांगितले की सर्वच लोक सांगायचे की तुमचे पैसे काही केले तरी परत मिळणार नाही परंतु भाऊंनी सांगितलं तुमचे पैसे भेटणार म्हणजे भेटणार म्हणून भाऊंचे खूप खूप धन्यवाद.यावेळी श्री. देवराव भाऊ भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा,अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला आघाडी, वसंत पाटील पोटे, सुनील बांगरे,प्रफुल रोहणकर , मोरेश्वर धोडरे कालिदास गव्हारे, मायाबाई कोहळे, बंडुजी देऊलमल्ले,धनराज बुरांडे उपस्थित होते.