
दिनांक १३/०४/२०२३ रोजी मौजा रावेरी येथिल ग्राम पंचायत कार्यालयामध्ये सरपंच श्री राजु तेलंगे यांच्या अध्यक्षतेखाली गावकऱ्यांची विशेष सभा घेऊन तलाठी जयश्री गेडाम यांनी सलोखा योजनेची सखोल माहिती दिली ती खालीलप्रमाणे सर्वच स्तरावर आज रोजी शेत जमिनीच्या ताब्यावरुन शेतकऱ्यांमध्ये होणारे आपापसातील वाद मिटविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सलोखा योजना राबवली असून या योजनेत एका शेतकऱ्यांच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतक-याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल तर अशा शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्त नोंदणीसाठी १००० मुद्रांक शुल्क व व नोंदणी फी १००० आकारण्याबाबत सवलत देण्यात आली आजचा ‘दिवस’ सलोखा योजना दिवस म्हणून राबविण्यात येत असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी या सलोखा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान आज रावेरी येथे तलाठी जयश्री गेडाम मॅडम यांनी या सलोखा योजनेमध्ये आपसातील वाद मिटविण्याकरित शासन निर्णय प्रमाणे अटी राहणार असुन सर्व अटी व शर्ती बाबत तलाठी यांनी सभेत दिली. सलोखा योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने काढलेली असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवी या उद्देशाने सर्व स्तरातून केल्या जात आहे. म्हणुन पात्र लाभार्थी यांनी लाभ घ्यावा असे आव्हान तलाठी यांनी सभेत केले आहे. सभेचे अध्यक्ष पदी रावेरी येथिल सरपंच श्री. राजु तेलंगे, ग्राम पंचायत सदस्य व मोठ्या संख्येने शेतकरी गावकरी हजर होते.
