
चंद्रपूर: तुकुम येथील डीपी रोड च्या कन्स्ट्रक्शन करिता छाबडा लेआऊट मधील नागरिक मागील सहा वर्षापासून वाट बघत आहे, कित्येक निवेदन दिल्यानंतरही चंद्रपूर मनपाकडून काहीही कारवाई करण्यात आलेले नाही. तुकूम प्रभाग क्रमांक एक मधील लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा ह्या विषयावर आपली पाठ फिरवली आहे. याला त्रस्त होऊन यासंदर्भात येथील नागरिकांनी आम आदमी पार्टीच्या शहर अध्यक्ष योगेश गोखरे यांना तक्रार केली. आम आदमी पार्टी शहर तर्फे मनपा आयुक्त यांना 30 दिवसाच्या आत दुसऱ्यांदा आज निवेदन देण्यात आले.
आप ने ह्या विषय ला आपल्या हातात घेऊन डीपी रोड संदर्भात निवेदन देऊन मनपा आयुक्त सोबत चर्चा केली, चर्चेतून लक्षात आले की चंद्रपूर मनपाकडे निधीची कमतरता आहे आणि निधी आली तरीही या लोकप्रतिनिधी आपल्या मनानुसार त्याचा वापर करण्यात भाग पडतात. येथील नागरिक रोड संबंधित लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करण्यात गेल्यास त्यांना फक्त खोटे आश्वासन देण्यात येते. मनपा आयुक्तांनी छाबडा लेआऊट च्या डीपी रोड ला प्राध्यान देऊ आणि डीपी रोड चे सर्वे करून जिथे कुठे रोडवरील अतिक्रमण झाले असेल त्याला हटवून तातडीने ह्याचे काम सुरु करू असे आयुक्ताने आश्वासन दिले, या वेळेला आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष योगेश गोखरे, पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकर साखरकर, भीमराव मेंढे, प्राध्यापक एस पी साळवे, पी एन तेलंडे, सुधाकर गुरपोडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
