तालुका क्रीडा संकुल येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

सहसंपादक: रामभाऊ भोयर

शहरातली स्व राजीव गांधी क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व नवोदय क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये खेळाडूंना हॉलीबॉल, हँडबॉल व कबड्डीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे हे शिबिर सकाळीं व सायंकाळी या दोन सेशन मध्ये घेण्यात येत आहे हे शिबिर राळेगाव येथील तालुका क्रीडा अधिकारी सचिन मिलमिले यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश दुर्गे व सागर जुमणाके घेत आहे व हॉलीबॉल चे प्रशिक्षण हे नवोदय क्रीडा मंडळाचे वरिष्ठ खेळाडू प्रफुल खडसे, गणेश काळे, मोणू खान, महेश राजकोल्हे, सचिन डोंगरे, सोनु खान, निखिल ठाकरे, सूरज भगत, सूरज उजवणे, मिथून झाडे व मयुरी चौधरी देत आहे. शिबिरात सहभागी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे त्यामुळे मुलांनी शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन नवोदय क्रीडा मंडळ राळेगाव यांनी केले आहे.