आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना गोल्डन कार्ड शिबीरचे व केवायसीचे ठिकठिकाणी अंमल बजावणी चालू आहे पण निंगनूर जन आरोग्य मोहिमेस ग्रामपंचायती अनास्था?

उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )

आयुष्यमान भारत जन आरोग्य ही योजना आरोग्य विभागाकडून सुरु असलेल्या योजनेच्या नोंदी करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतनीं कडून जनजागृती व्हावी जेणे करून गावाकऱ्यांना शासनाच्या आरोग्य सुविधेचा लाभ घेता येईल . सर्व सामान्याचे परवडेल असा विविध आजारावर उपचार घेहून सर्व सामान्याचे जिवनमान उंचावेल यात काही शंका नाही हेच ध्यानात घेऊन राज्य सरकारने व केंद्र शासनाने आरोग्य योजनेला विविध योजनेला बळकटी देण्याचे काम चालू केले आहे. सर्व साधारण कुटुंबतील व्यक्तीने शरीर हेच संपत्ती असतें तसेंच ज्या व्यक्तीची परिस्थिती जेमतेम असेल व एखादया आजाराने ग्रासले असल्यास अशा योजना मुळे नक्कीच त्या कुटूंबाला खूप मोठा आधार स्वरूपात मदत होईल असे प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा येथील अधिकारी डॉ. सुनील दुबे यांनी सांगितले आहे जवळपास निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत नागेशवाडी, निंगनूर (तांडा ), चिंचवडी, अनंतवाडी, संकरवाडी, महादेव वाडी, या ठिकाणी दोन हजार पाचसे ब्यानव नागरिका पैकी पन्नास नागरिकांनी नोंदणी झालेली आहे तरी निंगनूर ग्रामपंचायतने अंतर्गत येणारे गाव व वाडी येथे बैठक घेऊन त्यांना आयुष्यमान भारत व जन आरोग्य योजना बदल माहिती देऊन त्यांना जन जागृती करून शासकीय आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील दुबे यांनी आवाहन केले आहे.