क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन. . महामानवाच्या खडतर प्रवासाची साक्ष असलेल्या ठिकाणी राजगृह असो मुंबईतल्या चाळीतील खोली, इ. ठिकाणी वाचनालयातील वाचकांनी भेटी द्यायला पाहिजेत असे प्रतिपादन मोहनरावजी हरडे आणि बाबासाहेब प्रमाणे वाचकांनीसुद्धा एकाग्रतेने वाचन करायची गरज आहे असे प्रतिपादन सौ.वसुधाजी ढाकणे यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय विठ्ठलवाडी, वणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे व वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.बाळासाहेबजी राजूरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून वाचकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक संचालक नामदेवरावजी जेनेकर तर प्रास्ताविक सचिव प्रा.विजयजी बोबडे यांनी केले. या वेळी वाचनालयातील वाचक कु.कृतिका खडसे, कु.सरजा सोयम व कु. दिव्या ढेंगळे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भाषणातून व गीतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सहा. ग्रंथपाल शुभमजी कडू तर आभार संचालक अनिलकुमारजी टोंगे यांनी मानले. यावेळी संचालक सुरेशजी राजुरकर, प्रभाकरावजी मोहितकर,ग्रंथपाल उमेशजी रासेकर व वाचनालयातील वाचक उपस्थित होते.