जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेट येथे बालक पालक मेळावा उत्साहात संपन्न ,इयत्ता पहिलीसाठी विद्यार्थ्यांचे नाव दाखल

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेट येथे आज दिनांक 28 एप्रिल रोजी पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निमित्त बालक पालक मेळावा 2023-24 या सत्रासाठी शाळा पूर्वतयारी चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर शाळा समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते रिबीन कापण्यात आली व प्रतिमा पूजन करून आयोजित कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यामध्ये उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक, पालक आणि बालक यांनी उपक्रम राबविले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष: श्री गणेश मंगल चव्हाण,
उपाध्यक्ष: सौ. पुष्पलता अनिल राठोड,
मुख्याध्यापक. श्रीमान कांबळे सर, शिक्षक.चव्हाण सर,
शिक्षिका: देशमाने मॅडम, भेंडे मॅडम, बल्लाळ मॅडम, भुजाडे मॅडम, निमजे मॅडम, बडे मॅडम, गाडगे मॅडम, व अंगणवाडी सेविका शेवंताबाई चव्हाण
पंचफुलाबाई जाधव हे सर्व उपस्थित होते.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक या शाळेत शिक्षक वृंद व शिक्षिका हे उच्च श्रेणीचे प्रगतशील दर्जाचे उत्कृष्ट शिक्षक जिल्हा परिषद मध्ये उपलब्ध असून सुद्धा आपण नॉन ग्रांटेड इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलमध्ये आपल्या मुलाबाळांना पैसे खर्च करून पाठवतो.आपण आवडीने 30 ते 40 हजार रुपये, एवढी डोनेशन भरून पब्लिक स्कूलमध्ये ऍडमिशन करत असते, जेणेकरून आपला मुल घडला पाहिजे . मेट येथे जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या विकसित करण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असते. त्याकरिता कोणताही खर्च न करता आपल्या मुलाबाळांना जिल्हा परिषद ची मोफत शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून घ्यावी. खेळामध्ये पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता जिल्हास्तरीय पर्यंत व राज्यस्तरीय पर्यंत विद्यार्थ्यांना वाव मिळते याच्यासाठी जिल्हा परिषद ही उत्तम आहे, पालक वर्गाने इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना व्यर्थपणे नाव दाखल करू नये असे आवाहन जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांकडून पालकांना करण्यात आले आहे.