
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील खैरी या गावातून सुरू असलेल्या कोळसा तसेच वाळूच्या जड वाहतुकी विरोधात खैरी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी २९ एप्रिल रोजी चक्का जाम आंदोलन केले होते.परीणामी जवळपास एक ते दीड तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्वता आंदोलनाला भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून कोसारा खैरी मार्गे वणी तसेच घुग्गूस आदी ठिकाणी कोळशाची अवजड वाहतूक दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.तसेच लगतच्या कोसारा व सोईट या शासन लिलाव झालेल्या वाळू घाटातून देखील काही दिवसांपासून वाळूची वाहतूक सुरू आहे.त्यामुळे कोसारा ते खैरी तसेच खैरी ते वडकी व खैरी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गावातुन जाणाऱ्या ८०० मीटर अंतराच्या सिमेंट रोडची अक्षरशः चाळण झाली असल्याने हि जड वाहतूक पुर्णतः बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे यापुर्वी तालुका प्रशासनाकडे खैरी वासियांनी दिली होती.मात्र तालुका प्रशासनाने खैरी ग्रामस्थांच्या मागणीला केळाची टोपली दाखविल्याने अखेर निवेदनकर्त्यांनी रास्तारोको आंदोलनाचा पवित्रा उगारत आज २९ एप्रिल रोजी खैरी येथील बाजार चौकात विनोद माहुरे यांच्या नेतृत्वात वरोरा ते वडकी हा राज्य मार्ग जवळपास दीड तास अडवून धरला होता.दरम्यान अवजड वाहतूकीवर आळा घालावा.तसेच या मार्गावर आठवडी बाजारासह शाळा व कॉलेज असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशा मागणीचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळचे मोटर वाहन निरीक्षक किरण कुमार लोणे यांना देण्यात आले.दरम्यान खैरी परीसरात पुढील एक महिना आर.टी.ओच्या विशेष दोन पथकाकडून वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितल्या गेले.या आंदोलनात खैरी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ.किरण तृशांत महाजन, सदस्या सौ.रमाताई वनकर यांच्या सह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.दरम्यान वडकीचे ठाणेदार विनायक जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
