

उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
निंगनूर, मेट, ढाणकी मार्ग उमरखेड पर्यन्त पोहचतो त्यामुळेया भागातील।नागरिकांसाठी हा महत्वाचा रस्ता आहे . निंगनूर – ढाणकी रोडवर असलेल्या स्टोन क्रशर मुळे या मार्गावर मोठमोठ्या ट्रकच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरश :-चाळण झाली आहे. ढाणकी निंगनूर रोडवर सुद्धा स्टोन क्रशर असून या स्टोन क्रशर च्या वाहनातून काही प्रमाणात गिट्टी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी स्वार कधी घसरून पडेल व त्याचं अपघात केव्हा होईल हे सांगता येणार नाही . निंगनूर ते मेट या मार्गावर असे मोठ मोठे खड्डे पडलेले आहे कीं त्या खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साचून अपघात होऊ शकते. या ठिकाणी शासकीय यंत्रणा हतबल होताना बघायला मिळत आहे . आज उमरखेड डेपो येथून MH-40, N 9365 ही बस ढाणकी मेट मार्ग निंगनूर, किनवट जात असताना या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये त्या बसचे ब्रेक पट्टे तुटले . वारंवार या रस्त्याचे वळण वर
जास्त अपघात घडत आहे म्हणून उर्वरित रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्याची ग्रामस्थांची मागणी व निंगनूर येथील पोलीस पाटील श्री. उत्तम मुडे यांचे जनप्रतिनिधी ना आवाहन आहे.
