
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तेलंगणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी कॉग्रेसेचे जिल्हाध्यक्ष अँड प्रफुल्लभाऊ मानकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या खतांवर, तसेच शेती उपयोगी अवजारे घेतले तरी त्या वस्तुवर जीएसटी लावल्या जात आहे. ऐकतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेमधून शेतीसाठी घेतलेले कर्ज शेतकऱ्यांच्या शेतीच्या कापुस, सोयाबिन, तुर व इतर पिकांना भाव मिळाल्याने शेतीसाठी बँकेकडून घेतलेले कर्ज भरता येत नाही. त्यामुळे बँकचे अधिकारी हे शेतकऱ्यांना कर्जवसुलीचा तगादा लावत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परीवारात तानतनाव निर्माण होऊन ते आत्महत्या पर्यंत पोहोचले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात खास करून यवतमाळ जिल्हात आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. जर तेलंगणा सरकार तेलंगणा राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना ३१ हजार कोटींची कर्जमाफी करु शकते तर महाराष्ट्रातील शेतकरी बँकेच्या कर्जवसुली तगाद्याला कंटाळून आत्महत्या करतात त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीचा सरकारने सुद्धा महाराष्ट्रात संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे आवाहन प्रफुल्लभाऊ मानकर शेतकरी नेते तथा जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी महायुतीच्या सरकारला केले आहे.
