
मिस इंडिया फिटनेस 2022 आयोजित चंद्रपूरच्या शिवानी रामटेके ने मिस फ्लेक्सिबल टायटल पटकाविला आहे. देशभरातून आलेल्या 24 स्पर्धकांना मागे टाकत शिवाणीने हा किताब मिळविला आहे.
इच्छाशक्ती, मेहनत करण्याची तयारी आणि टॅलेंट असूनही मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात उंची गाठण्यासाठी गॉडफादर असणे गरजेचे असल्याची या क्षेत्रातील खमंग चर्चा. मात्र स्वतःवर दृढ विश्वास आणि कुटुंबियांची साथ असल्यास तुम्हाला जिंकण्यापासून कोणीच थांबवू शकत नसल्याचा अनुभव चंद्रपूरच्या शिवानी रामटेके ने सांगितला. शिवानीने पी. बी. फिटनेस आणि वूमन एम्पोवेरमेण्ट असोसिएट नेटवर्क यांच्या द्वारे आयोजित केलेल्या मिस इंडिया फिटनेस (सिजन 2) मध्ये मिस फ्लेक्सिबल हा खिताब जिंकला.
हा कार्यक्रम नागपूर येथील तुली इंपिरियल मध्ये 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या ब्रँड एम्बेस्डर सोनाली स्वामी या होत्या, ज्या एशियन बॉडी बिल्डिंग आणि स्पोर्ट फिसिक भूतान 2016 च्या कांस्य पदक विजेत्या आहेत.
