ओमनीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सहसंपादक -रामभाऊ भोयर

भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार
धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर हैद्राबाद महामार्ग ४४ वरील मंगी फाट्याजवळ सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

नयनलाल गुलाबराव काळे वय ५१ रा. दहेगाव असे मृतकाचे नाव आहे. सदर इसम आपल्या एम.एच. २९ क्यु २७९२ क्रमांकाच्या दुचाकीने दहेगावकडून वडकी कडे जात होता. तर एम. एच. २९ आर ६०९८
क्रमाकाची चारचाकी ओमनी हे वाहन वडकीकडे जात होते. अशातच मंगी फाट्याजवळ ओमनीने मागुन दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार नयनलाल काळे हे गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी जखमी अवस्थेत काळे यांना दहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिका-यांनी काळे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघातग्रस्त ओमनी महामार्गावरून ३० फुट खाली उतरली. या घटनेची माहिती मिळताच वडकी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.